क्रीडा

मंदीचा धोका,जागतिक बाजारांचा बुडबुडा लवकरच फुटणार ; गोल्डमन सॅच समूहाने दिला इशारा

वृत्तसंस्था

जगाला मंदीचा धोका असून जागतिक बाजारांचा बुडबुडा लवकरच फुटणार आहे, असा इशारा गोल्डमन सॅच समूहाने दिला आहे. गुंतवणूकदारांनी कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्लाही जागतिक वित्तसंस्थेने दिला आहे.

आमच्या अर्थतज्ज्ञांच्या मते, युरोप सोडून येत्या १२ महिन्यात जगभरात मंदीचा धोका कमी आहे. रशिया व युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर यंदाच्या जूनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड दरवाढ झाली. कारण युक्रेनमधून उत्पादन येणे ठप्प झाले. तसेच पुरवठा साखळी खंडित झाली. आता मंदीचे सावट सर्वत्र पसरले आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी विशेषत: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी आणखी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारी जगभरातील शेअर बाजार कोसळले. फेडरल रिझर्व्ह आणखी धक्कादायक निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे, असे गोल्डमनने सांगितले. आता गुंतवणूकदारांनी कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने कमोडिटीज हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.

घाटकोपरमधील होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती समोर, फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश

Video : घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग BPCLपेट्रोल पंपावर कोसळलं; ४ जणांचा मृत्यू , 50 हून अधिक जखमी

रवी राणा यांच्या घरी चोरी; दोन लाखांची कॅश घेऊन नोकर बिहारला पळाला

Video : मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामामधले CCTVबंद; सुप्रिया सुळे यांची कारवाईची मागणी

Video : मतदान केंद्रावरच भिडले आमदार आणि मतदार, तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...