क्रीडा

रोहित शर्माने दोन फ्लॅट भाड्याने दिले , दरमहिन्याला मिळणार 'इतके' रुपये

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ओशिवरा येथील लोट‌्स‌ सिग्नेचर इमारतीत चार कार्यालये विकत घेतली

Swapnil S

मुंबई : क्रिकेटर रोहित शर्माने वांद्रे (प.) येथील दोन फ्लॅट भाड्याने दिले आहेत. येते तीन वर्षे त्याला भाड्यापोटी दरमहा तीन लाख रुपये मिळणार आहेत. हे दोन्ही फ्लॅट १४ व्या माळ्यावर असून त्याचे क्षेत्रफळ १०४७ चौरस फूट आहे.

पहिल्या वर्षी दरमहा ३.१ लाख, दुसऱ्या वर्षी ३.२५ लाख रुपये, तर तिसऱ्या वर्षी ३.४१ लाख रुपये भाडे मिळणार आहे. फ्लॅटच्या अनामत रकमेपोटी भाडेकरूने ९.३ लाख रुपये मोजले आहेत. २०२२ मध्ये रोहितने हे फ्लॅट भाड्याने दिले होते. त्याला दरमहा २.५ लाख रुपये भाडे मिळाले होते.

अभिनेता सलमान खानने वांद्रे (प.) येथील फ्लॅट भाड्याने दिला आहे. येते तीन वर्षे त्याला दरमहा १.५ लाख रुपये भाडे मिळते. भाडेकरूने अनामत रकमेपोटी ४.५ लाख रुपये दिले आहेत. पहिल्या वर्षी १.५ लाख, दुसऱ्या वर्षी १.५७ लाख, तर तिसऱ्या वर्षी १.६५ लाख रुपये भाडे मिळणार आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ओशिवरा येथील लोट‌्स‌ सिग्नेचर इमारतीत चार कार्यालये विकत घेतली. यासाठी बच्चन यांनी २८.७३ कोटी रुपये मोजले. त्यांनी ही कार्यालये वॉर्नर म्युझिक प्रा. लिमिटेडला भाड्याने दिली. दरमहा १७.३० लाख रुपये भाडे असेल. ३६ महिन्यांनंतर हे भाडे १९.९० लाख रुपये असेल. बच्चन यांना तीन वर्षे भाड्यापोटी २.७ कोटी रुपये मिळतील. त्यानंतर चौथ्या व पाचव्या वर्षी २.३८ कोटी मिळणार आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत

आता रेल्वे डब्यांमध्ये कॅमेरे बसवणार

उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित; राष्ट्रपतींनी पाच सदस्यांना केले नियुक्त