क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघाला उपविजेतेपद; हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धा

अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला नेदरलँड्सकडून २-७ असा दारुण पराभव पत्करावा लागला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाला ‘हॉकी फाईव्ह विश्वचषक’ स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला नेदरलँड्सकडून २-७ असा दारुण पराभव पत्करावा लागला.

नेदरलँड्सकडून यान्नेरे व्हॅन डी वेन्ने (दुसऱ्या आणि १४व्या मिनिटाला), बेंटे व्हॅन डर वेल्ड (चौथ्या आणि आठव्या मि.), लाना कालसे (११ आणि २७व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर आणखी एक गोल सोशा बेनिगाने १३व्या मिनिटाला केला. भारताकडून ज्योती छत्री (२०व्या मि.) आणि ऋतुजा पिसाळ (२३व्या मि.) यांनाच गोल करता आला.

अंतिम लढतीत सुरुवातीपासून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी शोधल्या. नेदरलँड्सने दुसऱ्याच मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर पाच मिनिटांत दोन गोल करून वेल्डने नेदरलँड्सची आघाडी वाढवली. लाना कालसेने ११व्या मिनिटाला ही आघाडी आणखी भक्कम केली. मध्यंतरापर्यंत आणखी दोन गोल करत नेदरलँड्सने ६-० अशा आघाडीसह विजय जवळपास निश्चित केला होता. उत्तरार्धात नेदरलँड्सच्या आक्रमणाला भारतीय संघाने प्रतिकार केला.

महासंघाकडून रोख पारितोषिक

भारतीय महिला संघाने हॉकी फाईव्ह विश्वचषकात केलेल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना भारतीय हॉकी महासंघाने संघातील प्रत्येक खेळाडूस तीन लाख, तर प्रशिक्षक आणि साहाय्यकांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले.

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी

राजकीय पक्षांच्या कार्यालयांना ‘पॉश’ कायद्यातून वगळले; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

सर्व नियमांचे पालन, बदनाम करू नका; ‘वनतारा’ला सुप्रीम कोर्टाची क्लीनचिट

...तर SIR ची संपूर्ण प्रक्रिया रद्द करू; सुप्रीम कोर्टाचा इशारा

पाकिस्तानची भारताविरोधात तक्रार; लढतीनंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराजी; सामनाधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी