सचिन तेंडुलकरच्या २६ बॅट्स MCA संग्रहालयात ठेवणार; ‘बॅटोग्राफी’ प्रदर्शन सोमवारपासून X
क्रीडा

सचिन तेंडुलकरच्या २६ बॅट्स MCA संग्रहालयात ठेवणार; ‘बॅटोग्राफी’ प्रदर्शन सोमवारपासून

क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील २६ खास बॅट्स मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट देणार आहे. यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतकांपैकी काही शतके ज्या बॅट्सने झळकावली, त्यांचाही समावेश आहे. याशिवाय कारकिर्दीशी संबंधित अन्य आठवणी आणि वस्तूही संग्रहालयात प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील २६ खास बॅट्स मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट देणार आहे. यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतकांपैकी काही शतके ज्या बॅट्सने झळकावली, त्यांचाही समावेश आहे. याशिवाय कारकिर्दीशी संबंधित अन्य आठवणी आणि वस्तूही संग्रहालयात प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

हेल्मेट, जर्सी आणि कारकिर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांशी संबंधित वैयक्तिक नोंदींचाही या संग्रहात समावेश आहे. १६ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमात या संग्रहाचे अनावरण करण्यात येणार आहे. ‘बॅटोग्राफी’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, सचिनने कारकिर्दीच्या विविध टप्प्यांवर वापरलेल्या बॅट्सच्या माध्यमातून त्याचा देदीप्यमान क्रिकेटप्रवास उलगडण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या १३व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हे प्रदर्शन सुरू होत आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी वानखेडे स्टेडियमवर सचिन वेस्ट इंडिजविरुद्ध आपला २००वा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

देवेंद्र फडणवीस-तटकरे भेट; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात

मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू