क्रीडा

ICC Ranking : टीम इंडिया तीनही फॉरमॅटमध्ये ठरली अव्वल; तर अश्विनचीही भरारी

भारतीय क्रिकेट संघ तीनही फॉरमॅटमध्ये (ICC Ranking) पहिला क्रमांकांवर विराजमान झाली असून अश्विननेही आयसीसी क्रमवारीत भरारी घेतली आहे

प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाने (Team India) आता आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये (ICC Ranking) अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीने जारी केलेल्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ एकदिवसीय, टी-२० तसेच कसोटीमध्येही पहिल्या स्थानी विराजमान आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये पहिल्याच कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. भारतीय संघाला याचा मोठा फायदा आयसीसी क्रमवारीत झाला आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल स्थानी विराजमान आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ १११ गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला. इंग्लंडचा संघ १०६ गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंडचा संघ १०० गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ८५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. २०२३ या वर्षात आत्तापर्यंत भारतीय संघाने एकही मालिका गमावलेली नाही. पहिले श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकली. त्यानंतर न्यूझीलंडसोबतही मालिका विजय प्राप्त केला.

अश्विनने कसोटी गोलंदाजी गाठले दुसरे स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या नागपूर कसोटीत भारताच्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीची कमाल दाखवला. यावेळी दोघांच्या खात्यात एकूण १५ विकेट आहेत. या कसोटीमध्ये अश्विनने चांगली कामगिरी करत ८ विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता अश्विनने ८४६ रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरून दुसरे स्थान पटकावले आहे.

Pune : नशेच्या विळख्याला आता सरकारी घेराव! अमली पदार्थांविरोधात १९ सरकारी विभाग एकत्र येणार!

Mumbai : एसी बसची दिवाळी भेट; नव्या कोऱ्या ४८ बस प्रवासी सेवेत, ४१ आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

Amul Price Hike : दिवाळीच्या तोंडावर अमूलचे तूप-लोणी महागले; नवे दर किती?

दिवाळी बोनसवरून कर्मचारी आक्रमक! नवी मुंबईत ४५ हजार रुपये, पण ठाण्यात केवळ २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आंदोलनाचा इशारा

कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर