क्रीडा

ईडन गार्डन्सच्या स्टँडला झुलनचे नाव देणार

ती एक खास क्रिकेटपटू आहे आणि दिग्गजांच्या सोबत तिचे नाव झळकण्यास ती पात्र आहे.

वृत्तसंस्था

‘चकडा एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेली झुलन गोस्वामी शनिवारी क्रिकेटचा पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर निवृत्त झाल्यानंतर तिच्या चमकदार कामगिरीचा गौरव म्हणून तिचे नाव ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमच्या एका स्टँडला देण्यात येणार आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी सांगितले की, 'आम्ही ईडन गार्डन्सच्या स्टँडला झुलन गोस्वामीचे नाव देणार आहोत. ती एक खास क्रिकेटपटू आहे आणि दिग्गजांच्या सोबत तिचे नाव झळकण्यास ती पात्र आहे. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानगीसाठी आम्ही आर्मीशी चर्चा करणार आहोत. झुलनचा सत्कारही करणार आहोत. ईडन गार्डन्सवर २५ वर्षांपूर्वी, १९९७ च्या वर्ल्डकप अंतिम फेरीत झुलनने बॉल गर्ल (सीमारेषेबाहेरील चेंडू उचलणारी मुलगी) जबाबदारी वाहिली होती. स्वत: ३९ वर्षीय झुलनने दोन दिवसांपूर्वीच याबाबत माहिती दिली होती.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको