विंडीजचे महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स यांचे निधन X
क्रीडा

विंडीजचे महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स यांचे निधन

क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू आणि वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स (गॅरी सोबर्स) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

Swapnil S

ब्रिजटाऊन: क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू आणि वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स (गॅरी सोबर्स) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

दिग्गज क्रिकेटपटू सोबर्स यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा डॅनियल याने दुजोरा दिला आहे. सोबर्स यांचा ९०वा वाढदिवस अवघ्या १० दिवसांवर होता. क्रिकेट जगताने पाहिलेल्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते.

सर गारफिल्ड सोबर्स यांनी मार्च १९५४ ते एप्रिल १९७४ या काळात वेस्ट इंडिजचे ९३ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी ५७.७८च्या उत्कृष्ट सरासरीने ८,०३२ धावा केल्या. यामध्ये २६ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. डाव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हातानेच वेगवान मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या सोबर्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २३५ बळी घेतले.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकमेव एकदिवसीय सामना खेळला, ज्यामध्ये त्यांना एक बळी मिळाला होता. याशिवाय, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सलग सहा षटकार मारणारे ते जगातील पहिले फलंदाज होते. त्यांनी १९६८ मध्ये ‘नॉटिंगहॅमशायर’कडून खेळताना ‘ग्लॅमॉर्गन’विरुद्ध हा ऐतिहासिक पराक्रम केला होता.

सर गारफिल्ड सोबर्स यांना क्रिकेटचा पहिला महान आणि आधुनिक ऑलराऊंडर मानले जाते. फलंदाजीतील क्लास, गोलंदाजीतील विविधता आणि चित्त्यासारखे चपळ क्षेत्ररक्षण यामुळे सोबर्स यांनी क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेलं. सोबर्स यांचा हा खेळ फक्त कॅरेबियनच नाही, तर जगभरातल्या तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरला.

एकूणच सोबर्स यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वात पोकळी निर्माण झाली असून असंख्य माजी क्रिकेटपटूंनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मतदार म्हणून वगळले तरी नागरिकत्व कायम - सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना हटवण्याच्या विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लांबणीवर

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ

कुटुंब वाढले! राणी बागेत चार 'बाळ पेंग्विन'; दोन नर, दोन मादी हंबोल्ट पेंग्विन पिल्लांचा जन्म; संख्या २१ वरून २५ वर

Nanded : दोन मुलांसह शिक्षकाची आत्महत्या; कार थेट गोदावरी नदीत, व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप