क्रीडा

WPL 2026 : अंतिम फेरीत बंगळुरूचे दिल्लीवर वर्चस्व

महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ४ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली.

Swapnil S

बडोदा : एकीकडे युवा विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठलेली असतानाच गुरुवारी क्रीडाप्रेमींना आणखी एका महाअंतिम मुकाबल्याचा आनंद लुटता आला. महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ४ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. जेमिमा रॉड्रिग्जने अर्धशतकी खेळी साकारली. मात्र बंगळरूने अखेरच्या षटकात हे लक्ष्य गाठून दुसयांदा जेतेपद मिळवले. स्मृती मानधना व जॉर्जिया वॉल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दिल्लीला सलग चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात आले.

९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टीने ही डब्ल्यूपीएल निर्णायक ठरत आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान