ठाणे

केदार दिघें विरोधात गुन्हा दाखल

महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघें विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळून आल्याचे शिंदे गटाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Swapnil S

ठाणे : महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघें विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळून आल्याचे शिंदे गटाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान केदार शिंदे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत काहीही आढळले नसल्याचे केदार दिघेंनी म्हटले आहे.

ठाण्याच्या अष्टविनायक चौकात केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदिप शेंडगे यांच्यासर इतर साथीदारांनी कारमध्ये विदेशी मद्य आणि २ हजार रुपयांची पाकिटे वाटण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. त्यानंतर केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझी गाडी चेक करतानाचा व्हिडीओ मी जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करत आहे. त्यात काही सापडले नाही. हा मला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून मी स्वतःहून पोलीस स्टेशनला माझी गाडी घेऊन गेलो होतो, त्यानंतर जे काही घडत आहे, ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिघेंनी म्हटले आहे.

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल