ठाणे

रील बनवता तरुणाचा ठाकुर्ली पंपहाउसमधील खोल विहीर पडून मृत्यू

तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम ३२ तास सुरु होते.

शंकर जाधव

डोंबिवली : ठाकुर्ली येथील पंपहाउस मधील खोल विहीर पडून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबर असलेल्या दोन मित्रांनी विष्णूनगर पोलिसांना याबबत माहिती दिली असता पोलिसांनी शनिवारी रात्री अग्निशामक दलाला कळविले. तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम ३२ तास सुरु होते. सोमवारी सायंकाळी अग्निशामक दलाच्या जवानांना विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल सोहिल शेख ( १८ ) असे खोल विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मुंब्रा येथील बिलाला हा दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रिल काढण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल विहिरीत पडला. हे पाहून त्याचे दोन मित्र जवळील रेल्वे सुरक्षा बलाकडे गेले. मित्रांनी माहिती देताच रेल्वे सुरक्षा बलाने विष्णूनगर पोलिसांना कळविले. विष्णूनगर पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेकडील अग्निशामक दलाला माहिती दिली. स्थानक अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले. ३२ तास शोध कार्य सुरु होते. सोमवारी सायंकाळी बिलाला यांच्या मृतदेहाला बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर

Mumbai : 'कामा'त आनुवंशिक समुपदेशन विभाग सुरू होणार; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Mumbai : नालेसफाईवर उपायुक्तांची नजर; आयुक्तांच्या आदेशानुसार 'ऑन दी स्पॉट' करणार पाहणी

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : आता ज्येष्ठ डॉक्टरांकडेच प्रशासकीय पदभार; रुग्णालयातील पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणार