ठाणे

चर्चेनंतर रिक्षाभाडे वाद मिटला

सीएनजीची वाढत्या भाववाढीमुळे जुने रिक्षा भाडे न परवडणारे असा रिक्षा चालकांचा कायमचा दावा यामध्ये प्रत्येकवेळी हमखास वाद होत

प्रतिनिधी

उपप्रादेशिक परिवहन विभागाने डोंबिवलीतील रिक्षा भाडे दर किती असावे असे अधिकृत दरफलक लावले नाही. किती अंतरासाठी किती दर हे ठरविण्याचा अधिकार रिक्षा युनियनला दिल्याचे दिसते. मनमानी रिक्षा भाडे वसुली होत असल्याचा प्रवाशांचा आरोप तर पेट्रोल आणि सीएनजीची वाढत्या भाववाढीमुळे जुने रिक्षा भाडे न परवडणारे असा रिक्षा चालकांचा कायमचा दावा यामध्ये प्रत्येकवेळी हमखास वाद होत असतात. यावर रिक्षाचालक आणि प्रवासी यांचे म्हणणे एकूण माजी नगसेवक नितीन पाटील व रंजना पाटील यांनी तोडगा काढला. प्रवासी व रिक्षाचालक यांना परवडतील इतके रिक्षा भाडे दर जाहीर केले. मात्र याला प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाला संघटनेने विरोध दर्शविला आहे.

माजी नगरसेवक पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर यावर साधकवाधक चर्चा झाली. चर्चेअंती शेअर पद्धतीने रिक्षा प्रवासी वाहतूक केली जाईल असे ठरिवण्यात आले. शेअर पद्धतीने प्रवाशाला स्टेशनला जाण्यासाठी आता २१ नाही १२ रुपये आकारले जातील. तर मीटरपद्धतीने पूर्वीचे २१ रुपये रिक्षा भाडे आकारले जातील.

डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव, लक्ष्मण रेषा, तुकाराम नगर येथे शेअर रिक्षामध्ये तीन सीट भरल्या जातात. लक्ष्मण रेषा व तुकाराम नगर येथे शेअर पध्दत नसल्यामुळे प्रवाशांना स्टेशनला जाण्यासाठी मीटरपध्दतीने २१ रुपये आकारले जात होते. रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचा अनेकवेळा रिक्षाचालकांशी वाद होत होते.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल