बदलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

बदलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

शहरात तीस वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Swapnil S

बदलापूर : शहरात तीस वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी भागात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री हा प्रकार घडला. या हल्ल्यात गणेश यादव (३०) याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र अबू हलाल शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात अवनीश सिंग आणि संदीप सिंग या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यादव आणि हल्लेखोरांमध्ये २०२२-२३ या काळात वाद झाले होते. त्यावेळीही त्यांच्यात हाणामारी झाली होती आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित तरुण जामिनावर बाहेर होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शिवसेनेचे आज दसरा मेळावे; दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

तीन नवीन धरणांचा प्रस्ताव; ठाण्यासह सहा शहरांची तहान भागविण्यासाठी नियोजन; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

निदर्शनांचा अधिकार; मात्र स्थानिकांना त्रास नको, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

काँग्रेसची विजयादशमी! 'गोकुळ' निवडणुकीत सतेज पाटलांनी दिला 'महायुती'ला धक्का

टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता