भिवंडीच्या बिल्डरला हनीट्रॅपमध्ये अडकवले; लाखो रुपयांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल 
ठाणे

भिवंडीच्या बिल्डरला हनीट्रॅपमध्ये अडकवले; लाखो रुपयांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात राहणाऱ्या ‘टोपीवाला’ कुटुंबाने भिवंडीतील एका बांधकाम विकासकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Swapnil S

भिवंडी: गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात राहणाऱ्या ‘टोपीवाला’ कुटुंबाने भिवंडीतील एका बांधकाम विकासकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा करून प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इशरत टोपीवाला, शहनाज इब्राहिम टोपीवाला, इरशाद इब्राहिम टोपीवाला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जमीर नवीद पटेल हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यातच तक्रारदारांनी २६ एप्रिल २०२४ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भिवंडीतील एका लॉजवर तिन्ही आरोपींनी हनीट्रॅपमध्ये अडवले. त्यानंतर हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याने तक्रारदार जमीर यांचे व्हिडिओ काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी महिला इशरत टोपीवाला या हिने वेळोवेळी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि घर घेण्यासाठी पैश्यांची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदारांनी समाजात बदनामी होण्याच्या भीतीने महिला आरोपीला आयफोन १४ प्रो मॅक्स व दोन मोबाईल, लॅपटॉप, आय पॅड, अवेनीस स्कुटी, सोन्याची अंगठी व बांगडया, कानातील झुमके, दोन एअर कंडिशन, जिमचे संपूर्ण साहित्य, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी वस्तू घेऊन दिल्या. तसेच आरोपी शहनाज आणि इरशादने आरोपी महिला इशरतला या गुन्हात मदत केल्याचे तक्रारदार जमीरने तक्रारीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, जमीरने ६ फेब्रुवारी रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल