भिवंडीत भीषण अग्नितांडव! मुंबई-नाशिक महामार्गावरील टायर व लाकडी पॅलेटच्या गोदामाला आग, Video 
ठाणे

भिवंडीत भीषण अग्नितांडव! मुंबई-नाशिक महामार्गावरील टायर व लाकडी पॅलेटच्या गोदामाला आग, Video

भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत टायर व लाकडी पॅलेटचा साठा असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Mayuri Gawade

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील निंबवली परिसरात मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या टायर आणि लाकडी पॅलेटच्या गोदामाला रविवारी (दि. २८) मध्यरात्री भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे मोठे लोट पसरले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोदामात मोठ्या प्रमाणात टायर आणि इतर कच्चा माल असल्याने आग वेगाने पसरली.

सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

अग्निशमन विभागाचे अधिकारी सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर गोदामातील सर्व कामगार आणि इतर व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाण्याअभावी अडचणी आल्या

आग विझवताना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. आवश्यक पाण्याची व्यवस्था करण्यास अडचणी आल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्याच्या कामात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागले, अशी माहिती सुरेश म्हात्रे यांनी दिली.

व्हिडिओ पाहा

आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दादरमध्येही आग लागल्याची घटना

दरम्यान, मुंबईतील दादर परिसरातही रविवारी आग लागल्याची घटना घडली. लोकमान्य टिळक रोडवरील एका मेट्रो दुकानाजवळ पाइपला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. आगीजवळच विद्युत खांब असल्यामुळे आग आणखी पसरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दोन्ही घटनांमुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम