ठाणे

होतकरू मित्रमंडळ यांना विजेतेपद

वृत्तसंस्था

होतकरू मित्रमंडळ, श्री विठ्ठल क्रीडा मंडळ यांनी वीर सावरकर मंडळ व शिवसेना वीर सावरकर नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अनुक्रमे महिला आणि ५५ किलो वजनी गटाचे विजेतेपद मिळविले.

ठाणे वीर सावरकर मार्ग येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र.१२०च्या मैदानावर संपन्न झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात होतकरू मित्रमंडळाने संकल्प क्रीडामंडळाचा कडवा प्रतिकार ४६-४४ असा मोडून काढत या गटाचे जेतेपदासह रोख रु. पाच हजार पटकाविले. उपविजेत्या संकल्पला रोख रु. तीन हजारांवर समाधान मानावे लागले. ५५ किलो वजनी गटात मध्यांतरातील २१-२२ अशा एका गुणाची पिछाडी भरून काढत श्री विठ्ठल क्रीडामंडळाने मावळी मंडळाचे आव्हान ५२-४० असे परतवून लावत रोख रु. पाच हजार व जेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. उपविजेत्या मावळी मंडळाला चषक व रोख रु. तीन हजारवर समाधान मानावे लागले.

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष