ठाणे

रेल्वे दुर्घटनेचे कारण गुलदस्त्यातच; वळणामुळे दुर्घटना घडली नसल्याचा रेल्वेचा दावा

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रेल्वे रुळांच्या वळणाचे मोजमाप केले. यामध्ये रेल्वे रुळांचे वळण या घटनेला कारणीभूत नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांमधील कॅमेऱ्यांमध्ये प्रवासी पडतानाचे चित्रीकरण झाले नसल्याने तपासामध्ये अडचणी येत आहेत.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रेल्वे रुळांच्या वळणाचे मोजमाप केले. यामध्ये रेल्वे रुळांचे वळण या घटनेला कारणीभूत नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांमधील कॅमेऱ्यांमध्ये प्रवासी पडतानाचे चित्रीकरण झाले नसल्याने तपासामध्ये अडचणी येत आहेत.

दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर जखमी प्रवाशांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर असलेल्या दोन प्रवाशांपैकी एका प्रवाशाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. तर एक प्रवासी अद्यापही व्हेंटिलेटरवर असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकलमधून ८ प्रवासी रेल्वे रूळांवर पडले. त्यापैकी ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या ५ प्रवाशांना ठाणे स्थानकात उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासामध्ये ६ प्रवासी कसारा, तर २ प्रवासी कर्जत लोकलमधून पडल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी रेल्वे रूळाला सुमारे २.५ अंशाचे वळण असून यामुळे दुर्घटना झाली नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रवासी पडतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नाही

मुंब्रा स्थानकातील फलाटावर असलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यामध्ये लोकल येत असल्याचे दृश्य कैद झाले आहे. मात्र, लोकलमधील लोक रुळावर पडतानाचे दृश्य कैद झाले नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे घटनेचे कारण समजण्यास अडथळा येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. ज्या लोकलमधील डब्यातून प्रवासी पडले तो डबा तपासणीसाठी कळवा कारशेडमध्ये पाठवण्यात आला आहे.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे