पोलिसांचा डोंबिवलीत 'सर्जिकल स्ट्राइक'; पलावा सिटीतून २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात 
ठाणे

पोलिसांचा डोंबिवलीत 'सर्जिकल स्ट्राइक'; पलावा सिटीतून २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात

नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी ऑपरेशन गरुड ३ अंतर्गत शनिवारी पहाटे डोंबिवली येथील पलावा सिटी परिसरात एकाच वेळी १६ ठिकाणी छापे टाकून २५ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

नवी मुंबई: नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी ऑपरेशन गरुड ३ अंतर्गत शनिवारी पहाटे डोंबिवली येथील पलावा सिटी परिसरात एकाच वेळी १६ ठिकाणी छापे टाकून २५ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २५ पोलीस अधिकारी आणि १०० अंमलदार सहभागी झाले होते. १९ मे रोजी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाशी येथील जुहूगाव भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. या कारवाईत अमली पदार्थविरोधी कक्षाने तीन नायजेरियन नागरिकांना बेड्या ठोकल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख २५ हजार रुपये किमतीचा, २५२.५ ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा 'कोकेन' हा अमली पदार्थ जप्त केला होता.

या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा तपास करताना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी डोंबिवली येथील पलावा सिटी परिसरात राहात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलीस आणि ठाणे पोलिसांनी व्यूहरचना आखली. तसेच दोन्ही शहरांच्या पोलीस दलातील २५ पोलीस अधिकारी आणि १०० अंमलदारांच्या पथकाने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकून २५ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये १४ पुरुष, ७महिला आणि ४ बालकांचा समावेश आहे.

कागदपत्रांची तपासणी सुरू

वाशीतील जुहूगावात झालेल्या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणातील तो मुख्य आरोपी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली, तर उर्वरित संशयित आफ्रिकन नागरिकांची मानपाडा पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स