ठाणे

डोंबिवलीत गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; रिक्षाचालक गजाआड

डोंबिवलीत एका ३१ वर्षीय गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवलीत एका ३१ वर्षीय गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजल खान असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सोमवारी पीडित गतिमंद तरुणीला कल्याण ग्रामीण परिसरातील सोनारपाडा परिसरात एका नातेवाईकच्या घरी जायचे होते. तिथे जाण्याकरिता पीडित गतिमंद तरुणीने रिक्षा पकडली.

रिक्षाचालक फैजलने तिच्या गतिमंदपणाचा फायदा घेत तिला सोनारपाडा येथे न सोडता मुंब्रा येथील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. काही तासांनंतर त्या तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या नातेवाईकांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीच्या आईने टिळकनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक फैजलविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात फैजलविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंड मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून फैजलचा नंबर सापडला. त्या नंबरच्या सहाय्याने फैजलचा पत्ता देखील पोलिसांच्या हाती लागला. ९ एप्रिल रोजीच्या रात्री पोलिसांनी फैजल खानला दिवा येथून अटक केली. कल्याण कोर्टाने फैजलला १४ एप्रिल रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास