डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! रेल्वे कामासाठी रात्रीची वाहतूक बंद; ठाणे वाहतूक पोलिसांचा अलर्ट 
ठाणे

डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! रेल्वे कामासाठी रात्रीची वाहतूक बंद; ठाणे वाहतूक पोलिसांचा अलर्ट

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेल्वे गेट परिसरात मध्यरात्री वाहतूक निर्बंध लागू असणार आहेत. रेल्वे कामामुळे मार्ग बंद करण्याचा निणर्य घेण्यात आला असून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेल्वे गेट परिसरात अत्यावश्यक रेल्वे संबंधित कामासाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १९ ते २१ डिसेंबर २०२५ असे तीन दिवस हे निर्बंध असणार आहेत. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत दररोज मध्यरात्री १२.०१ ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

ठाणे पोलिसांनी जारी केलेल्या वाहतूक नियंत्रण आदेशानुसार, एक्सप्रेस फाइट रेल्वे कन्सोर्टियमकडून मोठागाव रेल्वे गेट परिसरात रेल्वे ट्रकसंबंधित काम केले जाणार आहे. कामाच्या कालावधीत मोठागाव रेल्वे गेट ते रेतीबंदर रोडच्या आसपासच्या भागात दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

कोणते मार्ग बंद राहणार?

  • स्वामीनारायण सिटी चौक ते मोठागाव रेल्वे गेट

  • मोठागाव रेल्वे गेट ते नवीन कोपरगाव क्रॉस रोडवरील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मार्ग

  • रेतीबंदर चौकातून (पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग व रेटिबंदर रोडवरून) मोठागाव रेल्वे गेटकडे जाणारी वाहतूक

पर्यायी मार्ग कोणते?

  • वाहनचालकांनी नवीन कोपरगाव क्रॉस रिंग रोड मार्गे वळसा घ्यावा.

  • रेतीबंदर चौकातून येणाऱ्या वाहनांना पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथून महात्मा गांधी रोड त्यानंतर कोपर रोड पुढे नवीन कोपरगाव क्रॉस रिंग रोड मार्गे वळवले जाणार आहे.

आपत्कालीन सेवांना सूट

ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले की, "हे निर्बंध मोटार वाहन कायद्यानुसार लागू करण्यात आले असून, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने, ग्रीन कॉरिडॉर सेवा, ऑक्सिजन वाहतूक आणि अन्य अत्यावश्यक सेवा या आदेशातून वगळण्यात आल्या आहेत."

नागरिकांना आवाहन

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रत्यक्ष ठिकाणी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. "सूचित केलेल्या वेळेत या परिसरातून प्रवास टाळल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल," असेही पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार