(Photo - दीपक कुरकुंडे)
ठाणे

गतिशील ठाण्याच्या मॅरेथॉनमध्ये ‘जेन अल्फा’चा एल्गार; पदक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या संकल्पनेने रविवारी ठाणे शहरात ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचा उत्साह पाहायला मिळाला.

Swapnil S

ठाणे : ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या संकल्पनेने रविवारी ठाणे शहरात ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचा उत्साह पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वतः धावत सहभागी होत त्यांनी धावपटूंचा उत्साह वाढविला. मात्र, मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही शालेय विद्यार्थ्यांना पदक न मिळाल्याने त्यांनी थेट महापालिकेच्या मुख्य व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केले. ‘मेडल, मेडल’च्या घोषणांनी काही काळ मॅरेथॉनच्या जल्लोषाला वेगळे वळण मिळाले.

ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटांतील नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, लोकप्रतिनिधी आणि कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही शालेय विद्यार्थ्यांना पदक मिळाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या मुख्य व्यासपीठासमोर एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘मेडल, मेडल’ अशी घोषणाबाजी करीत त्यांनी पदक देण्याची मागणी केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने उपस्थितांचे लक्ष विद्यार्थ्यांकडे वेधले गेले.

विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत प्रमाणपत्रासह पदक देण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, या घटनेमुळे मॅरेथॉनच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची धाव

मॅरेथॉनच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी स्वतः स्पर्धेत धाव घेतली. यावेळी आमदार संजय केळकर, लोकप्रतिनिधी तसेच कलाकारांनीही त्यांच्यासोबत सहभाग घेतला. ठाणे शहर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका