Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद 
ठाणे

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

कल्याण : बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी याबाबतची अधिकृत सूचना दिली आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने, एल-निनोचा संभाव्य प्रभाव आणि मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने दिल्या आहेत. एमआयडीसीच्या जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत म्हणजेच ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या पाणीकपातीमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाणीकपातीच्या कालावधीपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navi Mumbai : मोठी बातमी! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द; प्रवीण गाडेंची होणार चौकशी, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार; समृद्धी, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा मार्गांना प्राधान्य

बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

चार जणांवर गुन्हे दाखल; पाच दिवसांत २,२९१ अनधिकृत फलक हटवले, महापौरांच्या पुढाकारानंंतर BMC ची विशेष मोहीम

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले