कल्याण-डोंबिवली युनिटचे प्रॉपर्टी प्रदर्शन १६ एप्रिलपासून; १५० पेक्षा अधिक प्रकल्प एकाच छताखाली 
ठाणे

कल्याण-डोंबिवली युनिटचे प्रॉपर्टी प्रदर्शन १६ एप्रिलपासून; १५० पेक्षा अधिक प्रकल्प एकाच छताखाली

क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री (MCHI) कल्याण-डोंबिवली युनिटतर्फे दि. १६ ते १९ एप्रिल दरम्यान १५वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या १४ वर्षांपासून घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून घरखरेदीदारांना आपल्या पसंतीचे घर निवडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

डोंबिवली : क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री (MCHI) कल्याण-डोंबिवली युनिटतर्फे दि. १६ ते १९ एप्रिल दरम्यान १५वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या १४ वर्षांपासून घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून घरखरेदीदारांना आपल्या पसंतीचे घर निवडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, ठाणे, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. १६ लाखांपासून ते १ कोटींपर्यंतच्या घरांची श्रेणी प्रदर्शनात पाहायला मिळणार असून, विविध बजेटमधील ग्राहकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले.

या प्रदर्शनात ४० हून अधिक विकासकांचे १५० पेक्षा अधिक प्रकल्प एकाच छताखाली पाहण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. पत्रकार परिषदेला क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण-डोंबिवली युनिटचे अध्यक्ष विकास जैन, प्रदर्शन समिती अध्यक्ष दिनेश मेहता, सचिव साकेत तिवारी, माजी अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि विकासक उपस्थित होते.

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक

'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

निर्भेळ यशाचे लक्ष्य; गोलंदाजांवर पुन्हा लक्ष! भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना