प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

KDMC Election : पहिल्याच दिवशी ३११ कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा ११ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा ११ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया, तर दिनांक १६ जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मतदार म्हणून नोंदणी असलेले, मात्र महापालिकेत किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद आदी ठिकाणी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान करणे शक्य होणार नसल्याने, त्यांच्या सोयीसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'विशेष टपाली मतदान सहाय्यता कक्ष'

या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व ९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात 'विशेष टपाली मतदान सहायता कक्ष' स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये दिनांक ९, १० व ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेत ९ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी एकूण ३११ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. टपाली मतदानाची ही सुविधा रविवार, ११ जानेवारी रोजीही उपलब्ध राहणार आहे.
विजयकुमार द्वासे, समन्वय अधिकारी टपाली मतदान

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू