ठाणे

'या' कारणाने आमदार गीता जैन यांनी लगावली अभियंत्याच्या कानशिलात ; स्पष्टीकरण देत म्हणाल्या...

यामुळे आमदार गीता जैन वादात सापडल्या आहेत

नवशक्ती Web Desk

आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील अभियंत्याची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे त्या वादात सापडल्या असून त्यांनी त्यांच्या या कृतीविषयी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील एका कुटुंबाचं घर पाडण्यासाठी पालिकेच पथक गेलं होतं. बेघर होण्याच्या भीतीने या कुटुंबाने आमदार गीरा जैन यांच्याकडे धाव घेतली. यावेळी गीता जैन यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईचा बडगा कशासाठी असा जाब विचारला.

यावेळी गीता जैन यांनी पालिकेच्या अभियंत्याला "लहान मुलं असलेलं घर पाडायला तुम्ही आला आहात माणसं आहात की राक्षस" असं सुनावलं आहे. यावेळी ज्यांच्या घरावर कारवाई करण्यात येत होती ती महिला जैन यांना रडून होत असलेल्या कारवाई बाबत सांगत होती. यावेळी आमदार गीता जैन चिडल्या आणि त्यांनी महापालिकेचे अभियंता शुभम पाटील यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमदारांनी दिलं स्पष्टीकरण

या कृतीबाबत आमदार गीता जैन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, मी अभियंत्याला म्हणाले की पावसाळ्यात अनधिकृत असली तरी त्या घरांमध्ये कोणी राहत असल्यास ती तोडू नये, असे शासनाचे आदेश आहेत. मी हे त्या अभियंत्याच्या लक्षात आणून देत होते. पण, मी बोलत असताना अभियंता हसत असल्याने माझा पारा चढला आणि मी त्याच्या कानशिलात लगावल्या, असं गीता जैन यांनी सांगितलं आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी