ठाणे

डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दी सरकारचीच जबाबदारी; राजू पाटील यांची टीका

मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी डोंबिवली रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथे रोज निर्माण होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि जीवघेणा प्रवास या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारवर घणाघात केला आहे.

Swapnil S

डोंबिवली : मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी डोंबिवली रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथे रोज निर्माण होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि जीवघेणा प्रवास या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारवर घणाघात केला आहे.

राजू पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र रोजचेच आहे. सरकारला रेल्वे म्हणजे केंद्राची जबाबदारी वाटते. एखादा अपघात झाला की ५ लाखांचा चेक घेऊन सत्ताधारी फोटोसाठी तयार असतात, पण रोजच्या या प्रवाशांच्या व्यथा कोणालाही दिसत नाहीत. डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. परंतु आजतागायत यावर कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत.

वंदे भारतमुळे उपनगरी सेवेवर ताण

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार वंदे भारत गाड्यांना देण्यात येणारी प्राथमिकता यामुळे उपनगरी सेवेवर ताण पडत आहे. मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा हे उपनगरी प्रवासी आहेत. त्यांच्या सुरक्षेची, सोयी-सुविधांची जबाबदारी राज्य सरकारची देखील आहे. केवळ केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया