Bhiwandi : सेप्टिक टँकमध्ये पडून सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू 
ठाणे

Bhiwandi : सेप्टिक टँकमध्ये पडून सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

शहरातील फरीद बाग परिसरात इमारतीमधील निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली. अल-फरीद इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने त्यात पडून सहा वर्षीय मोहम्मद अहमद मसूद याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Swapnil S

भिवंडी : शहरातील फरीद बाग परिसरात इमारतीमधील निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली. अल-फरीद इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने त्यात पडून सहा वर्षीय मोहम्मद अहमद मसूद याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा थरार इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थापनावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली होती. दुपारी मोहम्मदचे वडील आपल्या मोठ्या मुलाला शाळेतून घरी घेऊन आले. त्यानंतर लहान मोहम्मद अहमद हा राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये इतर मुलांसोबत खेळण्यासाठी गेला होता. खेळताना तो पार्किंगमधील सेप्टिक टँकवर ठेवलेल्या पत्र्याच्या झाकणावर उभा राहिला. मात्र हे झाकण आधीपासूनच खराब आणि कमकुवत असल्याने अचानक आत कोसळले आणि मोहम्मद थेट सेप्टिक टँकमध्ये पडला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा करून घरच्यांना माहिती दिली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत चिमुकल्याला बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड