ठाणे

टीईटी पेपर फुटीप्रकरणी चौथा आरोपी अटकेत; सूत्रधाराची पत्नी ताब्यात

टीईटी पेपर फुटीप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या पथकाला यश आले. या पेपर फुटी प्रकरणाचा सूत्रधार मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पाटणा येथून ताब्यात घेण्यात आले.

Swapnil S

भिवंडी : टीईटी पेपर फुटीप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या पथकाला यश आले. या पेपर फुटी प्रकरणाचा सूत्रधार मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पाटणा येथून ताब्यात घेण्यात आले.

भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या न्यायालयातील तिला हजर केले. तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता हा या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार आहे. त्याचा पत्नीसोबत असलेला मोबाईल संपर्क व त्यामधून सुमनकुमारी हिला आर्थिक लाभ मिळाला आहे का हे तपासण्यासाठी सरकारी अभिवक्ता ॲड. सुमित जाधव यांनी कोठडीची मागणी केली, तर आरोपीचे वकील ॲड. शैलेश गायकवाड यांनी फरार आरोपीची पत्नी असल्याने त्यांच्यात संपर्क होता. याचा अर्थ ती आरोपी होत नाही. त्यांनी पोलिसांना सहकार्य केल्याची बाजू मांडली.

यावर न्यायालयाने सुमन कुमारी गुप्ता हिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तपास यंत्रणा सुमन कुमारीचा पेपर फुटीचे नियोजन, रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहार, इतर आरोपींशी झालेला संवाद किंवा फरार संशयितांना दिलेली मदत आदींमध्ये सहभाग होता का? याची सखोलपणे चौकशी करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'