Thane : दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला वाढदिवसाचा बॅनर; Video व्हायरल  (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
ठाणे

Thane : दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला वाढदिवसाचा बॅनर; Video व्हायरल

या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या मोठ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे : ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका परिसरात मोठा अनर्थ टळला. पादचारी पुलावर लावलेला वाढदिवसाचा मोठा बॅनर अचानक तुटून थेट धावत्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे दुचाकीस्वार बचावला. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या मोठ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धावत्या दुचाकीवर कोसळला बॅनर

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पुलाखालून कार, दुचाकी आणि इतर वाहने जात असतानाच पादचारी पुलावरील मोठा बॅनर अचानक तुटून थेट एका धावत्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळताना दिसत आहे. काही क्षण दुचाकीस्वार गोंधळला असला, तरी त्याने प्रसंगावधान राखत दुचाकी सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर अंगावर पडलेला बॅनर बाजूला करून तो पुन्हा पुढील प्रवासाला निघाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही क्षणांचा उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

तीन हात नाका परिसरातील घटना

ही घटना ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा बॅनर कोणी लावला होता आणि तो कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तसेच, या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे की नाही, याबाबतही प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना

याच वर्षी तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगत उभारलेला मोठा बॅनर तुटून थेट धावत्या दुचाकीस्वारावर पडला होता. डॅशकॅममध्ये कैद झालेल्या त्या घटनेत दुचाकीस्वाराचे वाहन घसरून तो रस्त्यावर पडला होता. मात्र, सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...