'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Thane : भाजप नगरसेवकाच्या कन्येची फसवणूक; सेलिब्रिटी प्रमोशनच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

ठाणे शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या कन्या तथा उद्योजिका तन्वी डुंबरे यांची सेलिब्रिटींकडून ब्रँड प्रमोशन करून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या कन्या तथा उद्योजिका तन्वी डुंबरे यांची सेलिब्रिटींकडून ब्रँड प्रमोशन करून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हरियाणास्थित पीआर कंपनीच्या संचालिकेविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तन्वी डुंबरे यांचा महिलांच्या कपड्यांचा ऑनलाइन ब्रँड आहे. जुलै २०२५ मध्ये संबंधित पीआर कंपनीच्या संचालिकेने नामांकित बॉलिवूड कलाकार, इन्फ्लुएन्सर्स आणि मॉडल्समार्फत ब्रँडचे प्रमोशन करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी १२ महिन्यांचा रिटेनर करार करण्यात आला. त्यानुसार तन्वी यांनी ५ लाख २६ हजार ५०० रुपये आरटीजीएसद्वारे दिले, तसेच प्रत्येकी ५ लाख २६ हजार ५०० रुपयांचे तीन धनादेश दिले. कंपनीच्या सांगण्यानुसार विविध सेलिब्रिटी आणि त्यांच्या स्टायलिस्टकडे ब्रँडचे कपडे पाठविण्यात आले. मात्र, प्रमोशनचे कोणतेही काम झाले नाही. उलट सुमारे २० लाख ६० हजार रुपये किमतीचे कपडे परत न करता त्यांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स