Thane : वाहतुकीत मोठा बदल! कॅडबरी मेट्रोच्या कामासाठी घोडंबदर - नाशिक महामार्ग आठवड्याभरासाठी बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या 
ठाणे

Thane : वाहतुकीत मोठा बदल! कॅडबरी मेट्रोच्या कामासाठी घोडंबदर - नाशिक महामार्ग आठवड्याभरासाठी बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे ट्रान्सपोर्ट उपविभाग कॅडबरी मेट्रो स्टेशनवरील रूफ वॉटर ड्रेनेज गटर बसवण्याचे काम करणार आहे. यासाठी ३० टन क्षमतेचा मोबाइल क्रेन कॅडबरी फ्लायओव्हरवर उभारला जाणार असल्यामुळे वाहन वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती रस्तेबंदी करण्यात आली आहे.

Mayuri Gawade

ठाणे : कॅडबरी जंक्शन परिसरातील मेट्रोच्या महत्त्वाच्या कामासाठी ठाणे पोलीसांनी एक आठवड्याचा रात्रीचा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर कॅडबरी फ्लायओव्हरजवळ हे निर्बंध २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, दररोज रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत लागू राहणार आहेत.

का करण्यात आली रस्तेबंदी?

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे ट्रान्सपोर्ट उपविभाग कॅडबरी मेट्रो स्टेशनवरील रूफ वॉटर ड्रेनेज गटर बसवण्याचे काम करणार आहे. यासाठी ३० टन क्षमतेचा मोबाइल क्रेन कॅडबरी फ्लायओव्हरवर उभारला जाणार असल्यामुळे वाहन वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती रस्तेबंदी करण्यात आली आहे.

कोणता रस्ता बंद राहणार?

  • मुंबईहून नाशिक–घोडबंदरकडे जाणारा मार्ग

  • नितीन ओव्हर ब्रिजच्या चढणीच्या सुरुवातीला, डिव्हायडरजवळ वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग कोणता?

निर्बंधित मार्गावरील सर्व प्रकारची वाहने खालील रस्ता वापरू शकतात:

  • नितीन ब्रिज चढणीच्या सुरुवातीपासून स्लिप रोड

  • तेथून नितीन जंक्शन – कॅडबरी जंक्शन

  • नंतर स्लिप रोडने कापुरबावडी मार्गे आपल्या गंतव्यस्थानी जाऊ शकतात.

या वाहनांना सूट

खालील अत्यावश्यक सेवा वाहनांना रस्तेबंदीमधून सूट देण्यात आली आहे:

  • पोलीस वाहने

  • अग्निशमन दल

  • रुग्णवाहिका

  • ग्रीन कॉरिडॉर ऑपरेशन्स

  • ऑक्सिजन पुरवठा वाहनं

  • अन्य अत्यावश्यक सेवा

नवी मुंबईतही आठवडाभर रस्ता बंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील तारघर ब्रिज जवळील महत्त्वाचा सर्व्हिस रोडही २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात बंद राहणार आहे. विमानतळ कार्यान्वयनापूर्वी आवश्यक दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईचा पर्यायी मार्ग

वाहनांना खालील मार्गाने वळवले जाईल:

  • तारघर ब्रिज → गव्हाण फाटा-बेलापूर रोड

  • तिथून किल्ला जंक्शन

दोन्ही शहरांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळेत प्रवास करताना या बदलांची नोंद ठेवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mumbai : मराठीत OTP सांगितल्यामुळे संतापला कॅबचालक; प्रवाशासोबत घातली हुज्जत, VIDEO व्हायरल

BMC Gen Z Fellowship 2026 : पालिकेच्या कारभारात आता Gen Z चा सहभाग! ५० तरुणांना मिळणार कामाची संधी, कसं कराल अप्लाय?

नऊ वर्षांत ४४७ प्रवासी 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये; विमानात गोंधळ घालणाऱ्यांवर DGCA ची कठोर कारवाई

शाळा, कॉलेज, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार; शेल्टरसाठी मुंबई बाहेरील जागेची पालिकेकडून चाचपणी

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव