आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू; ठाणेकरांनो ३३ प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू; ठाणेकरांनो ३३ प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा

आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात व्यापक तयारी सुरू झाली आहे.

Swapnil S

ठाणे : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात व्यापक तयारी सुरू झाली आहे. घर तुमच्या नावावर आहे का?, घराचा कर्ता कोण?, वाहने किती?, घराचे छप्पर कोणते?, घराचा रंग कोणता? अशा तब्बल ३३ प्रश्नांची उत्तरे पुढील महिन्यात ठाणेकर नागरिकांना द्यावी लागणार आहेत.

पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष स्वरूपात जनगणना प्रक्रियेला सुरुवात होणार असून, पहिल्या १५ दिवसांत ठाणेकर नागरिकांना ॲपवर ही माहिती भरावी लागणार आहे. माहिती भरली नाही तर त्यानंतर घरोघरी येणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना ही माहिती द्यावी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर घरगणना (हाऊस लिस्टिंग) करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वयं-जनगणनेनंतर पुढील टप्प्यात १६ मेपासून प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया सुरू होणार आहे. या टप्प्यात प्रगणक घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी आणि संकलन करणार आहेत. एकूणच, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी होईल.
सचिन बोरसे, सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी जनगणना विभाग

एकूण ७८ फिल्ड ट्रेनर्स

या अनुषंगाने क्षेत्रीय प्रशिक्षकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. या कामासाठी नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत एकूण ७८ फिल्ड ट्रेनर्स (क्षेत्रीय प्रशिक्षक) नियुक्त करण्यात आले असून, त्यापैकी ३९ प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत माजीवाडा-मानपाडा, उथळसर, लोकमान्य-सावरकर आणि वर्तकनगर या प्रभागांमध्ये प्रशिक्षण सत्र पार पडले. त्यानंतर ९ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत वागळे, नौपाडा-कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी १ मे ते १५ मे या कालावधीत स्वयं-जनगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना जनगणना पोर्टलवर लॉगिन करून स्वतःची माहिती भरता येईल. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला युनिक कोड प्रदान केला जाईल.

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत