प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

ठाण्यात कुत्रा चावण्याचे प्रमाण वाढले; एका वर्षात ६७ हजारांहून अधिक नागरिकांना रेबीज लस

ठाणे जिल्ह्यात कुत्रा चाव्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ६७,११२ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे लागले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कुत्रा चाव्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ६७,११२ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे लागले आहे.

जिल्ह्यातील शहरी व दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कुत्रा चाव्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. उल्हासनगर-३ येथे सर्वाधिक १२,५९४, तर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात ११,७९३, उल्हासनगर-४ मध्ये ९,७८८ आणि अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात ८,४५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ५,१५७ रुग्णांवर रेबीज प्रतिबंधात्मक उपचार केले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रेबीज हा आजार एकदा बळावल्यास प्राणघातक ठरतो. त्यामुळे कुत्रा किंवा कोणत्याही संशयित प्राण्याने चावा घेतल्यास जखम तात्काळ साबण व स्वच्छ पाण्याने धुवून, विलंब न करता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कुत्रा चावल्याच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण अनेकदा भीतीपोटी मुले कुत्रा चावल्याचे पालकांना सांगत नाहीत. आपल्याकडे प्रतिबंधासाठी भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि नागरिकांची जागरूकता या तिन्ही बाबी समान महत्त्वाच्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तत्काळ वेळेवर उपचार घ्यावेत.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

Mumbai : नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णय

राज्यात गॅस, इंधनाचा पुरेसा साठा आहे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भुजबळांचे आवाहन

Mumbai : महापौरांचा VIP थाट कायम! मोटारीवर लखलखणार दिवे

२४ अनधिकृत नर्सिंग होम्सवर कारवाईचा बडगा; जन्म नोंदणी फॉर्म देणे बंद; बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर BMC चा कठोर पवित्रा

BMC सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा! ठाकरे सेनेच्या अंकित प्रभू यांची सूचना