प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

Thane : ६७ हजारांहून अधिक मतदारांच्या नावासमोरील ‘स्टार’ चिन्ह हटविणार

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ८३ हजार ६४५ संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६७ हजार ०७१ मतदार ‘दुबार’ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी दिली.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ८३ हजार ६४५ संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६७ हजार ०७१ मतदार ‘दुबार’ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी दिली.

मतदार यादीच्या पडताळणीदरम्यान या ६७ हजार ०७१ मतदारांची नावे व छायाचित्रे एकमेकांशी जुळत नसल्याचे आढळून आले. परिणामी, सदर मतदार दुबार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नावासमोरील स्टार चिन्ह काढून टाकण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, दुबार व बनावट मतदान रोखणे तसेच पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे, या उद्देशाने ही छाननी प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

मतदार यादी अचूक व दोषमुक्त असणे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने, प्रशासनाकडून ही कार्यवाही काटेकोरपणे राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या सुधारणांमुळे ठाणे महानगरपालिका निवडणूक अधिक पारदर्शक, विश्वासार्ह व सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, तपासणीत १६ हजार ५७४ मतदार प्रत्यक्ष दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह कायम ठेवण्यात येणार असून, त्यांच्या नावापुढे ‘दुबार मतदार’ असा शिक्का मतदार यादीत नमूद राहणार आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर विहित नमुन्यातील हमीपत्र भरून दिल्यानंतरच मतदानाची परवानगी देण्यात येणार आहे. दुबार मतदानास आळा घालण्यासाठी या मतदारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही उपायुक्त उमेश बिरारी यांनी स्पष्ट केले. संबंधित मतदाराने आपण एकाच ठिकाणी व एकदाच मतदान करीत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच मतदान करता येणार आहे.
उमेश बिरारी, उपायुक्त (निवडणूक)

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

Mumbai : नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती वरळीतील कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू

World Poha Day: नागपुरात ३ हजार किलो तर्री पोहा अन् मोफत वाटप चर्चेत; शेफ विष्णू मनोहरांच्या या डिशची खासियत काय?

Mumbai : बीकेसीत दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक वापरा; MMRDA चे आवाहन

Mumbai : उत्पन्नाची लपवालपवी करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका; पत्नीला पोटगी देण्याचे आदेश