ठाणे

मोठी बातमी ! राज्यात आणखी एका नेत्याचा अपघात, डंपरने दिली गाडीला धडक

गेले काही महिने राज्यात अनेक नेत्यांचे अपघात होत असून सातत्याने होणाऱ्या या अपघातांवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे

प्रतिनिधी

गेले काही महिने अनके नेत्यांच्या अपघाताच्या बातम्या समोर आल्या. अशामध्ये आणखी एका नेत्याचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघत झाला आहे. त्यांच्या गाडीला डंपरने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये त्यांना दुखापत झाली असून अंधेरीतील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, घाबरण्यासारखे काही कारण नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सावंत हे पालघरच्या मोखाद्यात कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी होते. सकाळी ११.३०च्या दरम्यान ते घोडबंदरजवळ सगनाई नाका येथे पोहचले आणि मागून डंपरने धडक दिली. यामध्ये त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी डंपर चालक इर्शाद शहजाद खानला ताब्यात घेतले आहे. तर, दीपक सावंत यांच्यावर अंधेरीमधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Bhiwandi : 'कृपया गुटखा मागू नका'; तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर पानटपऱ्यांवर झळकले फलक

FSSAI चा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, धातूच्या तारांवर बंदी; अन्यथा होणार कारवाई

Varanasi : 'ऑर्डर, ऑर्डर! आज मीच न्यायाधीश' म्हणत न्यायाधीशांच्या खुर्चीत बसली महिला; कोर्टात तासभर गोंधळ, Video व्हायरल

IAF AN-32 Aircraft Crash : जोरहाट विमान दुर्घटनेत ५ जवानांचा मृत्यू; सहवैमानिक जखमी, हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

सोशल मीडियावर मॅगीची चर्चा; अळ्या आढळल्याचा आरोप फेटाळत नेस्ले इंडियाचे स्पष्टीकरण, FSSAI कडून चौकशी सुरू