प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

मेट्रो १० च्या खर्चात ७१६ कोटींची वाढ; साडेपाच किमी रस्त्याच्या रुंदीकरणाचाही समावेश

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मेट्रो १० प्रकल्पाच्या अंतर्गत गायमुख ते फाऊंटनपर्यंतच्या साडेपाच किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मेट्रो १० प्रकल्पाच्या अंतर्गत गायमुख ते फाऊंटनपर्यंतच्या साडेपाच किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या या रस्त्याची रुंदी १८ ते २० मीटर असून ती ६० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो १०च्या खर्चात तब्बल ७१६ कोटी रुपयांनी वाढ झाली असून प्रकल्पाचा एकूण खर्च ८ हजार ५३५ कोटी रुपयांवर पोहचला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो १० च्या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. मेट्रो १०च्या मार्गावरील वृक्षतोड वाचवण्यासाठी तसेच या प्रकल्पाचा कालावधी कमी करण्यासाठी ०.६८ किमी लांबीच्या भूमिगत मार्गिकेऐवजी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो प्रकल्पाच्या कामात रस्ता रुंदीकरणाचा समावेश केला.

या पार्श्वभूमीवर मेट्रो १० च्या उन्नत मेट्रो मार्गासह गायमुख ते फाऊंटन हॉटेल या ५.४ किमी लांबीच्या घोडबंदर रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरणासह या प्रकल्पाच्या सुधारित किंमतीस सरकारने मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये या मेट्रो प्रकल्पाचा खर्च ४ हजार ४७६ कोटी इतका गृहीत धरण्यात आला होता. त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचा खर्च ७ हजार ८१३ कोटी ३५ लाख रुपये इतका झाला. आता रुंदीकरणाच्या कामामुळे प्रकल्पाच्या खर्चात आणखी ७१५ कोटी ९१ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

Mumbai : भक्तांना दिलासा! POP च्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात; उच्च न्यायालयाचा गतवर्षीचा निर्णय कायम

डिसुझा फुटबॉल मैदान प्रकरण : स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश; आरक्षण बदलण्याच्या निर्णयावरून BMC ला धरले धारेवर

सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी; अन्न आणि औषध प्रशासनाची घोषणा, उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास

विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा; अभिजीत दीपके आक्रमक, दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी

साखरेच्या साठेबाजीला चाप; सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांवर बंधने, ग्राहकांना दिलासा