ठाणे

ठाणे मनपात विविध समितीतील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

महापालिका निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तरी स्थायी समिती सदस्य, स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती व विषय समिती यांच्या सदस्य निवड प्रक्रियेस अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने सदस्य निवड प्रक्रिया लांबत चालली आहे.

Swapnil S

ठाणे : महापालिका निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तरी स्थायी समिती सदस्य, स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती व विषय समिती यांच्या सदस्य निवड प्रक्रियेस अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने सदस्य निवड प्रक्रिया लांबत चालली आहे.

येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समितीचे विषय पटलावर घ्या, असे आदेश आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे नवी मुंबईचे गणित अद्यापही न बदलल्यामुळे ही निवड लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष महासभेतच थेट सादर केला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

५ मार्च रोजी ही विशेष महासभा घेतली जाणार होती. परंतु अवघ्या एका दिवसात पालिकेने घुमजाव केले आणि सदस्य निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आता देखील त्याची तारीख अद्यापही निश्चित होऊ शकलेली नाही. येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत सदस्य निवडीचे विषय मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु त्या महासभेत सदस्य निवडीचे विषय घेण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तसेच पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतलेल्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले. परंतु त्यांचे अवसान गळाले आहे. सदस्य निवड आता केव्हा होणार हे या इच्छुकांना माहित नसल्याने ते देखील आता आशेवर बसले आहेत.

नवी मुंबईमुळे अडले घोडे

नवी मुंबईत भाजपने परिवहन समितीमध्ये आपल्याच पक्षातील सदस्यांना संधी दिली आहे. त्यामुळे त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले असल्याची राजकीय चर्चा आहे. याच कारणामुळे ठाण्यातील विषय समित्यांसह परिवहन, स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक पदांची निवड लांबणीवर टाकली जात असल्याची माहिती शिंदे सेनेतील एका वरीष्ठ नेत्याने दिली.

स्थायी समितीचे विषय महासभेत घ्या

सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थायी समितीचे विषय महासभेत घ्या, असे स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार १८ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समिती गठीत नसल्याने त्याठिकाणचे विषय महासभेत घेतले जाणार आहेत.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया