ठाणे

Thane : खुनाच्या गुन्ह्यात फरार महिलेसह दोन आरोपींना अटक

हत्येचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी नोंदवण्यात आला होता. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर मालमत्ता गुन्हे कक्षाने तपास हाती घेतला.

Swapnil S

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना मालमत्ता गुन्हे कक्षाने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. या प्रकरणात महेश नाखवा या तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. हत्येचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी नोंदवण्यात आला होता. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर मालमत्ता गुन्हे कक्षाने तपास हाती घेतला.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांची ओळख पटवली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काली उर्फ रघु जयंतीभाई चौहान (२७), शायर विनुभाई मंग्रोलिया (२१) यांचा समावेश असून दोन्ही आरोपी नायगाव पूर्व येथील कच्छ दरबार ढाब्याजवळ, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, काली उर्फ रघु याची प्रेयसीला मृत महेश नाखवा त्रास देत असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून त्याचा चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणात महिला आरोपी गीता मुकेश माली हिलाही ठाणेनगर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड