ठाणे

THANE : गुढीपाडव्यानिमित्त नौपाड्यात वाहतूक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर

ठाणे शहराचे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या आदेशानुसार, सकाळी ५:०० ते दुपारी ३:०० या वेळेत या परिसरात वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील.

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे शहरातील नौपाडा परिसरात गुढीपाडवा व नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन गुरुवारी (दि. १९ मार्च) रोजी करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यासंबंधी ठाणे शहर वाहतूक विभागाने सविस्तर वाहतूक नियंत्रण आदेश जारी केला आहे.

ठाणे शहराचे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या आदेशानुसार, सकाळी ५:०० ते दुपारी ३:०० या वेळेत या परिसरात वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील.

या कालावधीत काही प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी असेल. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणते रस्ते बंद?

१. डॉ. मूस चौक → हॉटेल साईकृपा मार्ग

  • डॉ. मूस चौक येथे सर्व वाहनांची एंट्री बंद

  • पर्यायी मार्ग : जांभळी नाका → चिंतामणी चौक

२. राव मारुती रोड → गोखले रोड

  • वंदना टी-पॉईंट येथे वाहनांना प्रवेश बंद

  • पर्यायी मार्ग : गजानन महाराज चौक → चिंतामणी ज्वेलर्स रोड

३. गोखले रोड → राम मारुती रोड (पु. ना. गाडगीळ चौक परिसर)

  • मढवी हाऊसजवळ वाहनांची एंट्री बंद

  • पर्यायी मार्ग : गोखले रोड → केम्ब्रिज → सत्यम कलेक्शन → घंटाळी मंदिर रोड → श्रद्धा वडापाव → पु. ना. गाडगीळ चौक → गजानन महाराज चौक

४. गडकरी सर्कल → डॉ. मूस चौक

  • गडकरी सर्कलहून डॉ. मूस चौकाकडे जाणारी वाहतूक बंद

  • पर्यायी मार्ग : दगडी शाळा → अल्मेडा चौक

५. अल्मेडा सिग्नल → वंदना टी-पॉईंट

  • अल्मेडा सिग्नलहून खोपट सिग्नलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश नाही

  • पर्यायी मार्ग : टीएमसी सर्कल → नितीन जंक्शन

पार्किंगवरही निर्बंध

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे.

पार्किंग बंद असलेले रस्ते :

  • चिंतामणी चौक → गडकरी सर्कल (तत्त्वा परिसर व सेंट जॉन्स स्कूल मागील भाग)

  • राम मारुती रोड → गजानन महाराज चौक ते गोखले रोड

  • साईकृपा हॉटेल → एसबीआय कॉर्नर

आपत्कालीन सेवांना सूट

या निर्बंधांमधून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवा वाहनांना सूट देण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही वाहतूक नियंत्रण व्यवस्था मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार लागू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

FASTag Annual Pass : फास्टॅग वार्षिक पास महागला; १ एप्रिलपासून मोजावी लागणार 'इतकी' किंमत

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…"