छायाचित्र : दीपक कुरकुंडे
ठाणे

ठाण्यात १९४५ तर नवी मुंबईत ४३० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

निवडणूक कामी कार्यरत असलेल्या तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : निवडणूक कामी कार्यरत असलेल्या तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या टपाली मतदानास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकूण १९४५ टपाली मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी महापालिकेच्या ९ प्रभाग समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, याच कार्यालयांमध्ये टपाली मतपत्रिका स्वीकारण्यात येत आहेत. आतापर्यंत मतदानाच्या दिवशी कार्यरत असलेल्या १२९२ कर्मचारी तसेच ६५३ पोलीस कर्मचारी यांच्याकडून टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

टपाली मतदानाची प्रक्रिया १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून निवडणूक कामी कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रभाग समितीनिहाय प्राप्त टपाली मतदानाची आकडेवारी

  • माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती : २१२

  • वर्तक नगर प्रभाग समिती : १९४

  • उथळसर प्रभाग समिती : २१४

  • लोकमान्य-सावरकर

  • नगर प्रभाग समिती : २३३

  • कळवा प्रभाग समिती : २४१

  • वागळे प्रभाग समिती : १७४

  • नौपाडा प्रभाग समिती : ४३९

  • मुंब्रा प्रभाग समिती : ७८

  • दिवा प्रभाग समिती : १६०

नवी मुंबईत ४३० कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी पॅम्पलेट्स, पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ, व्हिडीओ, डिजिटल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कर्तव्यावर नेमणूक करण्यात आलेल्या १३९ महिला व २९१ पुरुष अशा एकूण ४३० कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी टपाली मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती उपायुक्त तथा पोस्टल मतदान नोडल अधिकारी स्मिता काळे यांनी दिली. मतदान केल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी “आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा” असे आवाहन करत सेल्फीच्या माध्यमातून सर्व मतदार नागरिकांना संदेश दिला.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू