ठाणे

Thane : पोलीस उपनिरीक्षकावर सिमेंटच्या वीटेने हल्ला; उपचारापूर्वीच मृत्यू

पान स्टॉल बंद करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून गोंधळ घालणाऱ्या इसमाने पोलीस उपनिरीक्षक किसन कमलाकर भोईर (५६) यांच्या डोक्यात सिमेंटची वीट मारल्याची धक्कादायक घटना चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Swapnil S

ठाणे : पान स्टॉल बंद करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून गोंधळ घालणाऱ्या इसमाने पोलीस उपनिरीक्षक किसन कमलाकर भोईर (५६) यांच्या डोक्यात सिमेंटची वीट मारल्याची धक्कादायक घटना चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

गंभीर जखमी भोईर यांना तातडीने टायटन रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी सराईत गुन्हेगार राजू प्रेमकुमार वाल्मिकी (३०) याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास भोईर हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पोखरण रोड क्रमांक २ परिसरात गस्तीवर होते. सुभाषनगर येथे पान स्टॉलजवळ गर्दी झाल्याने त्यांनी स्टॉल चालकाला विहित वेळेत दुकान बंद करण्याची सूचना केली. त्यावेळी आरोपी गोंधळ घालत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही

Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

मराठा आरक्षणाचे आंदोलनस्थळ ११२३ दिवसांनंतर अखेर रिकामे; मंडप, व्यासपीठ हटवले

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष