प्रदीप पूर्णेकर संग्रहित छायाचित्र
ठाणे

Thane : पूर्णेकर हत्याप्रकरणी भूमिपुत्रांचा मोर्चा; पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांचे १ किंवा २ डिसेंबरला शक्तिप्रदर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला दीड महिना उलटूनही संशयितांवर अटकेची कारवाई झालेली नसल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे. पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्र संघटना या प्रकरणाच्या निषेधार्थ एकवटल्या असून, विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी १ किंवा २ डिसेंबरला ठाण्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Swapnil S

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला दीड महिना उलटूनही संशयितांवर अटकेची कारवाई झालेली नसल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे. पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्र संघटना या प्रकरणाच्या निषेधार्थ एकवटल्या असून, विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी १ किंवा २ डिसेंबरला ठाण्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संशयित माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी केला आहे. यासंदर्भातील पुरावे पोलिसांना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी मेणबत्ती मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलनांच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र, दीड महिना उलटूनही संशयितांवर अटकेची कारवाई न झाल्याने भूमिपुत्र संघटनांमध्ये नाराजी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने शनिवारी ठाण्यातील कोळी समाज हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महासंघाचे पदाधिकारी तसेच आगरी, कोळी आणि भंडारी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असल्याने त्यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यावर बैठकीत एकमत झाले.

राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलने करूनही शासनाचे लक्ष वेधले जात नाही, ही खंत आहे. या घटनेमुळे संपूर्ण सागरी पट्टयातील भूमिपुत्र अस्वस्थ आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
डॉ. गिरीश साळगांवकर, अध्यक्ष गावठाण, कोळीवाडे, पाडे संवर्धन समिती
पूर्णेकर यांच्या हत्येला दीड महिना उलटूनही संशयितांना अटक झालेली नाही. चूक करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, मात्र त्याआधी संशयितांना अटक होणे आवश्यक आहे. हा प्रश्न आता केवळ एका समाजापुरता मर्यादित राहिलेला नसून पाचही जिल्ह्यांतील व्यायप्रिय नागरिकांचा झाला आहे. मोर्चानंतरही कारवाई न झाल्यास आंदोलनस्थळी धरणे सुरू ठेवण्यात येईल.
निलेश पाटील, सरचिटणीस महासंघ

चिपी-नवी मुंबई विमानसेवा सोमवारपासून नियमित; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणे; सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना

'खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा!' आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा

Mumbai : पालिकेचा अस्फाल्ट प्लांटचा भूखंड भाड्याने देणार; ८१५ कोटींचा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याचा डाव

देशी पिस्तूल केवळ धोकादायक म्हणन 'प्रतिबंधित शस्त्र' ठरत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये