Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

तब्बल वर्षभर रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरती प्रक्रियेला अखेर वेग आला आहे.

Swapnil S

ठाणे : तब्बल वर्षभर रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरती प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. महापालिकेच्या ७०८ रिक्त पदांसाठी १ आणि २ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी सुमारे २४ हजार अर्ज प्राप्त झाले असून, परीक्षेनंतर एमपीएससीच्या धर्तीवर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अग्निशमन विभागातील ८३५ मंजूर पदांपैकी केवळ ३२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचे जूनमधील महासभेत निदर्शनास आले होते. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी तातडीने भरती करण्याची मागणी केली होती. महापालिकेने १० ऑगस्ट २०२५ रोजी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, फायरमन पदांसाठी होमगार्ड जवानांना देण्यात येणाऱ्या पाच टक्के समांतर आरक्षणाचा समावेश करण्यात आला नव्हता.

७०८ पदांचे वर्गीकरण

फायरमन ३८१, चालक यंत्रचालक २०७, सहाय्यक फायरमन १३ आणि अभियांत्रिकी विभागातील १०७ पदांचा समावेश आहे. अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता (नागरी) २४, यांत्रिकी १६, विद्युत ४ आणि कनिष्ठ अभियंता/स्थळ पर्यवेक्षकाची ६३ पदे आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन व अभियांत्रिकी विभागातील पदांचीच भरती करण्यात येणार असून, इतर संवर्गांतील पदांची भरती स्वतंत्रपणे केली जाणार आहे. वर्षभरानंतर भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अमेरिकेचा निर्णय भारताच्या पथ्यावर पडणार; महागाई कमी होण्यास मदत मिळणार, तज्ज्ञांचे मत

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

गुजरातमध्ये सैराट, २३ सेकंदांत १३ वार! प्रेमविवाहाच्या ७ वर्षांनंतर भावाने बहिणीचं पुसलं कुंकू

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू