ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या वृक्षतोडीला उच्च न्यायालयात आव्हान; वृक्षप्राधिकरण स्थापन न करताच परवानग्या दिल्याचा आरोप प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या वृक्षतोडीला उच्च न्यायालयात आव्हान; वृक्षप्राधिकरण स्थापन न करताच परवानग्या दिल्याचा आरोप

ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. वृक्षप्राधिकरणाची कायदेशीर स्थापना न करताच ठाणे महापालिकेने वृक्षतोडीच्या परवानग्या दिल्याचा आरोप करत पर्यावरण कार्यकर्ते आणि येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष रोहित मनोहर जोशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. वृक्षप्राधिकरणाची कायदेशीर स्थापना न करताच ठाणे महापालिकेने वृक्षतोडीच्या परवानग्या दिल्याचा आरोप करत पर्यावरण कार्यकर्ते आणि येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष रोहित मनोहर जोशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली हजारो झाडांच्या तोडीला परवानगी देण्याच्या प्रक्रियेवर याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्तांनी १७ जून २०२६ रोजी मंजूर केलेला ठराव आणि २४ ऑगस्ट रोजी दिलेल्या वृक्षतोड व पुनर्रोपणाच्या परवानगीला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या परवानगीनुसार रायलादेवी तलाव ते बाळकुम या मेट्रो मार्गावर ५१९ झाडे तोडण्यास, तर २६९३ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता देण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, ठाण्यातील ४६०० हून अधिक झाडांबाबतही अशाच प्रकारे परवानग्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी

वृक्षप्राधिकरणाची तातडीने स्थापना करावी, संबंधित परवानग्या रद्द कराव्यात आणि स्वतंत्र तज्ज्ञ समितीचा अहवाल येईपर्यंत वृक्षतोड व पुनर्रोपणाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या विकासकामांसोबत शहरातील पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शिवसेनेचे आज दसरा मेळावे; दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

तीन नवीन धरणांचा प्रस्ताव; ठाण्यासह सहा शहरांची तहान भागविण्यासाठी नियोजन; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

निदर्शनांचा अधिकार; मात्र स्थानिकांना त्रास नको, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

काँग्रेसची विजयादशमी! 'गोकुळ' निवडणुकीत सतेज पाटलांनी दिला 'महायुती'ला धक्का

टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता