ठाण्यात RTO ॲक्शन मोडवर! २१ स्कूल बस व ४ अवैध बसेसवर कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

ठाण्यात RTO ॲक्शन मोडवर! २१ स्कूल बस व ४ अवैध बसेसवर कारवाई

मार्च महिन्यात ठाण्यात अवैध प्रवासी वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बसचालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १ ते ३१ मार्चदरम्यान स्कूल बस व अवैध खासगी प्रवासी वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांनी तब्बल १०० स्कूल बसेसची तपासणी केली असून त्यापैकी २१ बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Swapnil S

ठाणे : मार्च महिन्यात ठाण्यात अवैध प्रवासी वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बसचालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १ ते ३१ मार्चदरम्यान स्कूल बस व अवैध खासगी प्रवासी वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांनी तब्बल १०० स्कूल बसेसची तपासणी केली असून त्यापैकी २१ बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४ खासगी बसेसवरही कारवाई करण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर-ग्रामीण तसेच शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसांची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा यांची सखोल पडताळणी करण्यात आली.

अशा २१ स्कूल बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित चालक व मालकांना दंड ठोठावण्याबरोबरच नियमांची तात्काळ पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याच दरम्यान परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४ खासगी बसेसवरही कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, अधिकृत प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे.“नियम मोडणाऱ्यांना माफी नाही,” असे कडक धोरण राबवण्यात येणार आहे.
रोहित काटकर, अधिकारी उपप्रादेशिक परिवहन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) च्या मार्गावरील बसथांब्यांवर उभ्या प्रवाशांना उचलून बेकायदेशीर स्पर्धा करणाऱ्या बसवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य परिवहनचे पर्यवेक्षक आणि आरटीओ अधिकारी संयुक्तपणे कारवाई करत आहेत. यांनीही या विशेष मोहिमेची माहिती देत, नियमभंग करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
हेमांगिनी पाटील, अधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

AIचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार; राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर, ५ वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे 

सरपंच निवडणुकांमध्ये चाकणकर, तटकरेंना धक्का; मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

Mumbai : मानखुर्दमध्ये पोलिसाचा मृत्यू; उड्डाणपूल कामातील अपघातांची मालिका सुरुच

तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये काँग्रेसला अधिक पसंती; ‘एक्झिट पोल्स’मध्ये दीदींना धक्का