Thane : शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्यानंतर परिवहन विभाग ताळ्यावर; ST स्टँडमध्ये पंखे, शौचालयाची मोफत सुविधा आणि नवीन खुर्च्यांची व्यवस्था 
ठाणे

Thane : शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्यानंतर परिवहन विभाग ताळ्यावर; ST स्टँडमध्ये पंखे, शौचालयाची मोफत सुविधा आणि नवीन खुर्च्यांची व्यवस्था

अपुऱ्या सुविधांनी ग्रासलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी बसस्थानकातील समस्यांची दखल घेतल्यानंतर परिवहन विभागाने तातडीने सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे.

Swapnil S

ठाणे : अपुऱ्या सुविधांनी ग्रासलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी बसस्थानकातील समस्यांची दखल घेतल्यानंतर परिवहन विभागाने तातडीने सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शुक्रवारी बसस्थानकाची पाहणी करून प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच १५ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने तत्काळ कारवाई करत बसस्थानकात पंखे सुरू केले, शौचालयाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आणि प्रवाशांसाठी नवीन खुर्च्या बसवल्या.

ठाणे शहरातील महत्त्वाच्या एसटी बसस्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. विशेषतः ठाणे स्टेशन परिसरातील एसटी स्टँडमध्ये अस्वच्छता, बसण्याची अपुरी व्यवस्था, बंद पंखे आणि शौचालय सुविधांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी होती.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी शिवसैनिकांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच मुख्य नियंत्रक सागर पळसुळे यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अल्टिमेटमनंतर परिवहन विभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. दुसऱ्याच दिवशी बसस्थानकात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर