भ्रष्ट कारभाराने निसर्गाची कत्तल; ठाणेकर उकाड्यात, यंत्रणा एसीत सुस्त, पारा ३८ अंशांवर; मध्यरात्रीही उष्णतेचा तडाखा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

भ्रष्ट कारभाराने निसर्गाची कत्तल; ठाणेकर उकाड्यात, यंत्रणा एसीत सुस्त; पारा ३८ अंशांवर, मध्यरात्रीही उष्णतेचा तडाखा

निसर्गाची कत्तल करून शहरात काँक्रीटचे जंगल उभारले जात असल्याने ठाणेकरांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

Swapnil S

ठाणे : निसर्गाची कत्तल करून शहरात काँक्रीटचे जंगल उभारले जात असल्याने ठाणेकरांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वृक्षतोड, वाढते काँक्रीटीकरण आणि पर्यावरण संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील तापमानवाढीचा प्रश्न गंभीर बनत आहे. तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचत असून, मध्यरात्रीही ३० ते ३१ अंशांदरम्यान उष्णता जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारणी, ठेकेदार आणि सरकारी यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकेकाळी हिरवाईने नटलेले आणि तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात इमारती, रस्ते आणि विविध विकास प्रकल्पांमुळे मोकळ्या जागांचे प्रमाण कमी होत आहे. झाडांची घटती संख्या, सिमेंट-काँक्रीटचे वाढते प्रमाण आणि डांबरी रस्त्यांमुळे शहरात उष्णता साठून राहते. परिणामी, दिवसा जाणवणाऱ्या उन्हाचा त्रास रात्रीही कायम राहतो. सर्वसामान्य नागरिक उकाड्याने त्रस्त असताना प्रशासन मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

झाडे आणि मातीच्या मोकळ्या जागा कमी झाल्याने शहरी उष्णता वाढण्यास हातभार लागतो. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या झोपेवर आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

वृक्षतोडीवर नियंत्रण कधी?

विकास प्रकल्पांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरणीय नियमांचे पालन केले जाते का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. केवळ वृक्षारोपणाच्या घोषणा करून चालणार नाही, तर लावलेली झाडे जगवणे, जुन्या वृक्षांचे संरक्षण करणे आणि हरित क्षेत्र टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विकासकामांच्या मंजुरीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत प्रशासनाने पर्यावरणविषयक जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.

ठाण्याचा विकास निसर्गाच्या विनाशातून नव्हे, तर निसर्गाच्या संवर्धनातून झाला पाहिजे. राजकारणी, ठेकेदार आणि सरकारी यंत्रणेच्या कारभारावर नियंत्रण ठेवून पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा काँक्रीटच्या जंगलात ठाण्याची हिरवाई आणि पुढील पिढ्यांचे भविष्य हरवेल!
डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक, ठाणे

Mumbai : राडारोडा टाकला तर 'दंड'; आजपासून कारवाईचा बडगा, नोंदणी आणि वाहनांवर ट्रॅकिंग यंत्रणा बंधनकारक

UPI व्यवहारांवरील शुल्क कमी करण्याची IIT बॉम्बेची शिफारस; लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पाऊल उचलण्याचा अहवालातून सल्ला

Ulhasnagar : लटकत्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका! दुर्घटनेनंतरच महापालिकेला जाग येणार का?

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

Satara : कराडजवळ स्वीट कॉर्न मक्याच्या पिकाची चोरी; दुष्काळात शेतकऱ्याला आर्थिक फटका, परिसरात भीतीचे वातावरण