Thane Traffic Update : नौपाडा परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; ३० जूनपर्यंत नवे नियम लागू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Thane Traffic Update : नौपाडा परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; ३० जूनपर्यंत नवे नियम लागू

कॅडबरी जंक्शन ते नितीन जंक्शनदरम्यानच्या सेवा रस्त्यावर कुमार कंपनीकडून फ्री वे ब्रिजसंबंधित काम सुरू आहे. या कामासाठी...

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे शहरातील नौपाडा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. १ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत नौपाडा वाहतूक उपविभागात विशेष वाहतूक नियमन लागू करण्यात आले असून काही मार्गांवर प्रवेशबंदी, वळणबंदी आणि 'नो पार्किंग'चे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कॅडबरी जंक्शन ते नितीन जंक्शनदरम्यानच्या सेवा रस्त्यावर कुमार कंपनीकडून फ्री वे ब्रिजसंबंधित काम सुरू आहे. या कामासाठी सेवा रस्त्यावर बॅरिकेड्स उभारण्यात आल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत विशेष आदेश जारी केले आहेत.

धर्मवीर कट सेवा रस्त्यावर प्रवेशबंदी

धर्मवीर कट सेवा रस्तामार्गे तीन हात नाका जंक्शनकडे जाणाऱ्या बस, अवजड मालवाहू वाहने आणि इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. संबंधित वाहनांनी नाशिक-मुंबई महामार्गावरील स्लिप रोडचा वापर करून पुढील मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

'या' ठिकाणी डावीकडे वळण्यास मनाई

वासुदेव बळवंत फडके (भक्ती मंदिर) मार्ग, मोदी ह्युंदाई कट आणि HDFC कट येथून येणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्यावर प्रवेशासाठी डावीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी उजवीकडे वळून धर्मवीर कट मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

सेवा रस्त्यावर 'नो पार्किंग'

वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होऊ नये यासाठी धर्मवीर कट सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, तीन हात नाका जंक्शनकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन पार्किंगला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

आपत्कालीन सेवांना दिलासा

अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिस वाहने यांसारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि ड्युटीवरील वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल