ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेंतर्गत वाढीव क्षमतेची पंपिंग मशिनरी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रविवार, दि. २७सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावकरनगर, लोकमान्य नगर पाडा क्र. २, ३ व ४, चैतन्यनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वाघरीपाडा, रूपादेवीपाडा, रामनगर, सी.पी. तलाव, येऊर परिसर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, वाकळकुम, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ तसेच मुंब्रा रेतीबंदर आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शटडाऊननंतर पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.