मध्य रेल्वेवर तीन प्रवाशांचा ऐवज लंपास 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

मध्य रेल्वेवर तीन प्रवाशांचा ऐवज लंपास

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, झोपेचा व गर्दीचा फायदा घेत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्यात आली.

Swapnil S

ठाणे : मध्य रेल्वेवरील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, झोपेचा व गर्दीचा फायदा घेत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्यात आली. या तिन्ही प्रकरणांत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मीरारोड येथील नजमा मोहम्मद हसनैन जैदी या बिदर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत असताना ठाणे स्थानकात त्यांच्या सीटखालील बॅगेची चेन उघडी आढळली. त्यातील सोन्याचे मंगळसूत्र, नाकातील दागिना, घड्याळ, ओळखपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे आणि ८ हजार रुपयांची रोकड असा सुमारे २१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

दुसऱ्या घटनेत साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात झोपलेल्या उल्हास आवारे यांची कपडे, स्मार्ट वॉच व कागदपत्रे असलेली ८ हजार १०० रुपयांची बॅग चोरट्याने लंपास केली. तर कल्याण-सीएसएमटी लोकलमधून प्रवास करणाऱ्या वैभव वनकुद्रे यांची दोन मोबाईल, रोकड व कागदपत्रांसह १७ हजार ५०० रुपयांची सॅकबॅग चोरीला गेली. तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीत रावणासोबत ३० फुटी झुरळाच्या पुतळ्याचेही दहन; आयोजकांचे आभार मानत अभिजीत दिपके म्हणाले...

Dussehra 2026 : मुंबईत रावणदहन कुठे पाहाल? गिरगाव चौपाटीसह ठाणे, नवी मुंबईतील प्रमुख ठिकाणांची यादी

Mumbai : गोरेगावमध्ये उन्नत मार्ग; पालिका आयुक्तांकडून वीर सावरकर उड्डाणपुलासह विविध प्रकल्पस्थळांची पाहणी

Mumbai : लोकलमध्ये मोबाईल गोंगाटाला ५ हजार दंड; रेल्वे प्रशासनाची कारवाईची तयारी; सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाचीही तरतूद

'हजार वेळा सॉरी म्हणायलाही तयार!' सोनू निगमने कर्नाटकातील जनतेची मागितली माफी, पहलगाम हल्ल्याशी केली होती तुलना