वासुंद्री नागरिकांवर उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ; स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी शेड व सुविधा उभारण्याची मागणी 
ठाणे

वासुंद्री नागरिकांवर उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ; स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी शेड व सुविधा उभारण्याची मागणी

टिटवाळ्याजवळील वासुंद्री गावात भरपावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे...

Swapnil S

कल्याण : टिटवाळ्याजवळील वासुंद्री गावात भरपावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, स्मशानभूमीच्या सुविधांअभावी नागरिकांना करावा लागणारा त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पावसात अंत्यविधी सुरू असताना काही तरुण हातात ताडपत्री धरून उभे असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे चिता विझू नये आणि अंत्यविधी सुरळीत पार पडावा, यासाठी तरुणांची धडपड सुरू होती. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वासुंद्री परिसरात स्मशानभूमीसाठी योग्य जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, अद्यापही या प्रश्नावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कायमस्वरूपी शेडची मागणी

छताची सुविधा नसलेल्या उघड्या जागेवर अंत्यविधी करावा लागत असल्याने पावसाळ्यात मृताच्या नातेवाईकांसह उपस्थित नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अंत्यविधीसारख्या संवेदनशील प्रसंगी नागरिकांना अशा प्रकारे गैरसोयीला

सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी शेड उभारावे. तसेच पावसापासून संरक्षण, पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वासुंद्री ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

विशाखा राऊत यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश

Pune : पुरंदर विमानतळाचा मार्ग झाला मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली

कोयना धरण परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के; कोयनानगरचे भूकंपमापन केंद्र बंद

कर्जतमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; विजेच्या ठिणगीने मच्छरदाणी पेटली